40+ खेळाडूंच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा स्तुत्य उपक्रम
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील हनुमानपाडा येथे स्वर्गीय पिंट्याशेठ स्मृती चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सतीश पाटील, 40+ संस्थापक अध्यक्ष पेण तालुका यांनी केले होते. हे सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
या क्रिकेट सामन्यात प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत 50+ पेण तालुका विरुद्ध 50+ वन सोल्युशन नवी मुंबई यांच्यात होऊन वन सोल्युशन नवी मुंबई संघ विजयी झाला. या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नईम चोगले यांनी पटकावला असून त्यांना सन्मानचिन्ह, टी-शर्ट व कॅप देऊन गौरविण्यात आले. संघाला आकर्षक ट्रॉफी आयोजकांकडून देण्यात आली. या सामन्यांचे वैशिष्ट्य असे की, हा सामना सकाळी 8 वाजता सुरू झाला.

या क्रिकेट स्पर्धेत श्रीराम बळवली, बापूजी डावरे, जितू आई जिते, रायबादेवी रावे, बापूजी आंबिवली, बेस्ट दादर, कुंभारआळी पेण, खारपाले, नोटेड हनुमानपाडा, ट्रॉफी फाईटर्स नारवेलबेडी, जगदंबा वाशी, जाणता राजा कोपर अशा एकूण 12 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन निखिलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेसाठी संजय डंगर, मेजर विश्वास पाटील, गोपीनाथ मोकल, पत्रकार विनायक पाटील, चंद्रकांत पाटील, जे. के. म्हात्रे, विजय म्हात्रे, विश्वास पाटील, अनिल पाटील, सुधाकर म्हात्रे, नरेंद्रभाई, प्रवीण कुंभार, सुनील ठाकूर, अशोक ठाकूर, राजा पाटील, रमेश घरत, भूपेश घरत, निलेश पोलीस, दीपक घरत, प्रेमनाथ, प्रल्हादभाई शिवकर, चिऊभाई, सुदर्शन पाटील, आदित्य पाटील, अनंत म्हात्रे, प्रथमेश, विवेक, सागर, अनिकेत, सर्वेश, प्रफुल, प्रीतम, रंजीत, रोशन, विजय, मनोज, जगदीश, बाळू, गणेश, नरेश, सुनील, महेंद्र, हर्षद, आदेश, मितेश उपस्थित होते. नामवंत पंचांच्या भूमिकेत प्रणित (लल्ला), सुशील, स्कोरर संजोग पाटील, DJ साऊंड सिस्टिम आशिष पाटील, youTube live समर्थ इव्हेंट, कॉमेंटेटर अक्षय पाटील रावे, नोटेड हनुमान पाडा व ग्रामस्थ मंडळ हनुमान पाडा यांनी सहकार्य केले.

40+ सामन्यादरम्यान पेण तालुक्यातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती रोख रक्कम 10,000 रुपये मनमीत गोपीचंद पाटील यांच्याकडून देण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 40 प्लस खारपाले संघास रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक ट्रॉफी फाइटर्स नारवेलबेडी, तृतीय क्रमांक श्रीराम बळवली या संघांनाही रोख रक्कम व चषक देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज सुशील म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज दत्तात्रेय म्हात्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जितेंद्र पाटील, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी विनोद गायकर यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.