सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा शैक्षणिक उपक्रम
अब्दुल सोगावकर
सोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शनिवार दि. १५ जून २०२४ रोजी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची असलेली गरज लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सोगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू व मराठी शाळेत स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे दोन्ही शाळेच्या शिक्षक वर्गांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील थळे, चांदोरकर सर, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव, चंद्रकांत खोत, सानिका घाडी, लाईक कप्तान, किशोर सातमकर, नितीन अधिकारी, स्मिता राऊत, सुरेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजू पडते, सतिश घाडी, सचिन घाडी, सूचित थळे, शैलेश तिर्लोटकर, मुनावर कुर, संजय अनमाने, रोशन अनमाने, दत्ताराम भगत, प्रतिक पाटील, मनिष खाडे, परेश सुर्वे, निखिल करजूकर तसेच सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, उर्दु व मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.