• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र प्रिमियर लिग तर्फे खारघर येथे फॅन-पार्कचे आयोजन

ByEditor

Jun 16, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा सध्या पुणे येथील गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर दिमाखात सुरू आहेत. आयपीएलनंतर लगेचच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे गतवर्षीपासून महाराष्ट्र प्रिमियर लिग टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धेत ६ संघ सहभागी झाले असून २ जूनपासून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २२जून रोजी होणार आहे.

गेली दोन वर्षे महाराष्ट्र प्रिमियर लिग हि स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. ठिकठिकाणी स्पर्धेची जाहिरात मोठे बॅनर लावून केली जात असे. ह्यावर्षी पासून राज्यात विविध ठिकाणच्या मैदानावर फॅन-पार्क इव्हेंट आयोजित करून स्पर्धेची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवली जात आहे. फॅन-पार्क इव्हेंटमध्ये मोठ्या डिजिटल पडद्यावर लाईव्ह मॅचचे प्रेक्षपण केले जाते. चितळे एक्सप्रेस पुरस्कृत असलेलं फॅन-पार्कला प्रेक्षक मोठी गर्दी करून सामन्याचा आनंद घेत आहेत.

शनिवारी अशाच फॅनपार्कचे आयोजन खारघर येथील गोखले हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते. स्काय स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक विनय पाटील यांनी पुढाकार घेऊन फॅनपार्कचे आयोजन केले. रायगड रॉयल्स विरुद्ध पुणेरी बाप्पा ह्या संघाचा सामना मोठ्या डिजिटल स्क्रीनवर लाईव्ह दाखवण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य राजेश पाटील, ॲड. पंकज पंडित, खारघरचा राजा गणेश मंदिर संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, खारघर येथील युवा खेळाडूंसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!