• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेब किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेली तरुणी पाय घसरून पडली दरीत

ByEditor

Jun 17, 2024

प्रतिनिधी
कर्जत:
माथेरानच्या पेब किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रेकींगसाठी गेलेली एका तरुणीचा पाय घसरल्याने ती दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही तरुणी मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी आहे. रिया साबळे (16) असे या तरुणीचे नाव आहे. सुदैवाने या तरुणीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

निसरड्या पायवाटेवरुन पाय घसरला आणि…

माथेरानमध्ये अनेक पर्यटक हे मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी येत असतात. त्यासोबत माथेरान हे ठिकाणी ट्रेकींगसाठीही प्रसिद्ध आहे. माथेरानजवळ असलेला पेब किल्ला हा ट्रेकींग करणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. रविवारी 16 जून रोजी अंधेरीतील 10 जणांचा ग्रुप माथेरानला फिरायला गेला होता. यावेळी ते सर्वजण ट्रेकींग करुन पेब किल्ल्यावरुन परतत असताना निसरड्या पायवाटेवरुन या ग्रुपमधील रिया साबळे (16) हिचा पाय घसरला. ती ५० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी काही अंतरावर जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या रियाला माथेरान येथील सह्याद्री रेसक्यू टीमने बाहेर काढले.

या दुर्घटनेत रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हात, पाय आणि पाठीलाही जबर मार लागला. यानंतर तिला कर्जतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे तिच्या ग्रुपमधील तरुण-तरुणीही घाबरले. त्यांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!