सलीम शेख
माणगाव : घरातील रूमच्या दरवाज्याची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून २२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना मंगळवार, दि. १८ जून २०२४ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ११:३० च्या दरम्यान गोल्डन पार्क रेसिडेन्सी, पहिला मजला रूम नं. १०३ बी माणगाव या ठिकाणी घडली. या घटनेची फिर्याद अमोल प्रल्हादराव साळवे (वय -३७, रा.गोल्डन पार्क रेसिडेन्सी, पहिला मजला रूम नं.१०३ बी माणगाव मूळ रा.रामनगर औरंगाबाद) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी अमोल प्रल्हादराव साळवे यांच्या गोल्डन पार्क रेसिडेन्सी येथील राहते घरातील रूमच्या दरवाज्याची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून अज्ञात इसमाने घरातील २२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून तो फरार झाला आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा रजि.नं.१६१/२०२४ भादवि कलम ३८०,४५४,४५७ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत.