घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल
अब्दुल सोगावकर
सोगाव : बुधवार दि. १९ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंडीतील अवघड वळणावर आरसीएफ थळ कारखान्यातुन तुर्भे-मुंबईकडे रसायनाची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर टँकरचालक पळून गेला तर क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची खबर मिळाल्यानंतर अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकरमधील रसायनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरसीएफ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले, तर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, वाहतूक सुरळीत चालू आहे. अपघातग्रस्त टँकर सकाळी ११ वाजून १५ मिनिटांपर्यंत काढण्यात आला नव्हता, परंतु काहीवेळात क्रेनच्या साहाय्याने टँकर काढण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.