• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे कामार्ले येथे शैक्षणिक साहित्य वाटप

ByEditor

Jun 18, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे रविवार, दि. १६ जून रोजी अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथे अंगणवाडी ते १५ वीपर्यंत शिकत असलेल्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेल्या सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे कामार्ले गावात हा तिसरा शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ गणेश पाटील व योगिता गणेश पाटील यांच्या पुढाकाराने व अमेरिकेमध्ये स्थायिक असलेले परंतु मूळ रोह्याचे रहिवाशी समीर आगरकर व शर्मिला समीर आगरकर-फडके यांच्या आर्थिक मदतीने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे शार्दूल काठे, शुभांगी कुलकर्णी, विशाल आमले, राम कदम, किसन गायकवाड, सिध्दराज तरंगे आणि प्रतीक म्हात्रे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास श्री गणेश मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिराचे ट्रस्टी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणारे गणेश पाटील व योगिता पाटील आणि आर्थिक निधी उपलब्ध करून देणारे समीर आगरकर व शर्मिला समीर आगरकर-फडके तसेच कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करणारे मुख्याध्यापक विकास पाटील सर यांचे सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे आभार मानण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना माजी मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!