चोळे येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी प्रसाद भोईर यांनी केला संकल्प
किरण लाड
नागोठणे : शहरी भागात आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट यांच्या माध्यमातून नर्सरीमध्ये जसे लहान मुलांना प्रभावी शिक्षण दिले जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ग्रुप ग्रामपंचायत शिहू मधील सर्व अंगणवाड्या ‘स्मार्ट’ बनविण्याचा संकल्प भाजपचे पेण-सुधागड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रसाद भोईर यांनी केला आहे.
शिहू ग्रामपंचायतीतील चोळे येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसाद भोईर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पुढे म्हणाले कि, राजकीय, सामाजिक स्तरावर काम करित असताना एका सामाजिक बांधिलकीच्या उदात्त हेतुने शिहू व चोळे भागातील नवीन अंगणवाड्यांसाठी स्मार्ट अंगणवाडी किट देण्याचा माझा एक निर्धार आहे. तो लवकरच पूर्ण करील असे आश्वासन या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी दिले. आपल्या सर्वांच्या माध्यमातून लहान लेकरांना आपल्या आयुष्याची पहिली मुळाक्षरे सुसज्ज अशा नवीन इमारतीमध्ये गिरवता येतील यापेक्षा माझ्यासाठी दुसरा काय आनंद असु शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ग्रुप ग्रामपंचायत शिहू अंतर्गत येणारी तरशेत, मुंढाणी, बोरावाडी, जांभूळटेप, चोळे अशा गावात नवीन अंगणवाड्या इमारती बांधल्या आहेत. त्यासाठी भोईर यांनी पुढाकार घेतला आहे. चोळे येथील अंगणवाडीची नवीन इमारत उद्घाटनप्रसंगी पेण पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोईर, ग्रुपग्रामपंचायतीचे उपसरपंच अमृत कुथे, ज्येष्ठ नेते दत्ता कुथे, खंडू कुथे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन म्हात्रे, चिटणीस चंद्रकांत म्हात्रे, प्रविण कुथे, राजेंद्र म्हात्रे, हेमंत कुथे, कुमार कुथे, विजय पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिहू, कासु, नागोठणे विभागाला नव्हे तर संपूर्ण पेण तालुक्याला लाभलेले एक विकसनशील नेतृत्व म्हणजे प्रसाददादा भोईर आहेत. ते इतरांपेक्षा चाकोरीच्या बाहेर जाऊन आधुनिक विचार करतात हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्ये आहे. भविष्य काळात भोईर यांचे नेतृत्व मोठ झालेले आपल्या सर्वांना पाहायला मिळेल.
-संजय भोईर
माजी सभापती, पेण पंचायत समिती.