हरेश मोरे
साई /माणगाव : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट माणगांव यांच्या वतीने माणगांव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप माणगांव येथील कुणबी भवन या ठिकाणी 5 जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. ही संस्था मागील 17 वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत आहे. यावेळी विदयार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, पुस्तके तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

या संस्थेचे प्रमुख डॉ. विली डॉक्टर असून रायगड जिल्ह्यात शैक्षणिक कार्यक्रम राबवित असतात. यावेळी इंदापूर येथील नवजीवन हायस्कुल तळाशेत, खरवली नूतन माध्यमिक विद्यालय, लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई येथील गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच या संस्थेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे सकाळी 8 वाजता मार्गदर्शन क्लास घेतले जातात.
या कार्यक्रमासाठी करियर अकॅडमीचे संस्थापक परेश कोटकर, महिला पोलीस दीपाली मोरे, माणगांव पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन अधिकारी, पालक प्रतिनिधी पांडुरंग मोरे, प्रकल्प अधिकारी सहाय्यक मीनाक्षी उभारे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद विचारे, गीता गावडे, स्मिता काटू, हरेश शिंदे तसेच विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.