किरण लाड
नागोठणे : उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. याच दिवशी सगळीकडे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी 21 जून रोजी आनंदीबाई विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे योग दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिनेश भगत व माजी प्राचार्य डाॅ. संदेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रमुख अधिकारी प्रा. डाॅ. मनोहर शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. तसेच त्यांच्याकडून सराव करुन घेतला. योगाचे सात प्रकार कोणते आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना देऊन सुर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, मकरासन, भुजंगासन, कपालभाती, भम्रारिका या आसनांच्या व इतर प्राणायामाच्या प्रकाराचे तसेच पध्दतीचे प्रात्यक्षिके दाखवून या पध्दती मानवाच्या सुदृढ शरीरासाठी कशा फायदेशीर आहेत हे पटवून दिले.

या कार्यक्रमाामध्ये प्रा. डाॅ. श्रीकृष्ण तुपारे, प्रा. डाॅ. विलास जाधवर, प्रा. डाॅ. विजय चव्हाण, प्रा. डाॅ. सतिष पाटील, प्रा. जयेश पाटील, डाॅ. स्मिता चौधरी, सर्व वर्गशिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी, विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
