प्रतिनिधी
अलिबाग : तालुक्यातील मुनवली येथील तलावात 2 मुलं बुडाली. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडाली. बेपत्ता मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुले बुडाल्याची माहिती समोर आली आहे. बुडालेली मुले परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. या मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे. अथर्व हाके आणि शुभम बाला अशी
बुडालेल्या मुलांची नावे आहेत. अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले असून शुभमचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.