• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वाहतूक संघटनेच्या उरण तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

ByEditor

Jun 23, 2024

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

घनःश्याम कडू
उरण :
भारतीय कामगार संघटनेच्या वाहतूक विभागातर्फे आज उरण तालुक्यातील वाहतूक संघटनेच्या उरण विधानसभा अध्यक्ष करण चंद्रहार पाटील यांनी नियुक्त्या जाहीर केल्या. त्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यामध्ये उरण विधानसभा उपाध्यक्षपदी सौरभ दत्ताराम पाटील, जासई विभाग अध्यक्षपदी अतुल नामदेव मढवी व नवघर विभाग अध्यक्षपदी संतोष नामदेव पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व वाहतूक संघटनेबरोबर शिवसेना पक्षाचे कार्य पण आपल्या हातून घडावं अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, उरण विधानसभा वाहतूक अध्यक्ष करण पाटील, उरण विधानसभा सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, तालुका उपसंघटिका मनीषा ठाकूर, तालुका उपसंघटिका सुजाता पाटील, शिक्षक नेते कौशिक ठाकूर व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!