घन:श्याम कडू
उरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आमदार गणेश नाईक हे आले होते. त्यावेळी त्यांच्या कुटूंबाला धीर देत यापुढे मी तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी दिला. एकेकाळी आमदार गणेश नाईक यांचे प्रशांत पाटील हे खंदे समर्थक म्हणून उरण, नवी मुंबई परिसरात ओळखले जात होते.
प्रशांत पाटील यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अनपेक्षित जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला होता. पाटील यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अनेक राजकीय मंडळी येत आहेत. आज आमदार गणेश नाईक हे दिवंगत प्रशांत पाटील यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. यावेळी दिवंगत प्रशांत पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली. यावेळी आमदार गणेश नाईक यांनी कुटुंबाला धीर देत या संकटाला सामोरे जाऊन धैर्याने उभे रहाल तसेच आज जरी प्रशांत पाटील या जगात नसले तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वास दिला.