• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मापगांव विभागातील विद्यार्थ्यांचा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे यांच्यातर्फे गुणगौरव

ByEditor

Jun 24, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मापगाव हद्दीतील १०वी, १२वी, पदवीधर, सीबीएसई आदी शैक्षणिक क्षेत्रात भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे व त्यांच्या परिवारातर्फे रविवार, दि. २३ जून २०२४ रोजी टाकादेवी- बहिरोळे येथील सुमती शिक्षण मंडळाच्या सभागृहात गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, स्व. अनिलभाई थळे, स्व. उमेश थळे यांच्या हस्ते गेल्या २४ वर्षांपासून मापगाव विभागातील १० वीपासून पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन करण्यात येत आहे. याही वर्षी या विद्यार्थ्यांचा रविवार, दि. २३ जून रोजी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष काका ठाकूर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मुंबई विभागातून विविध पुरस्कार प्राप्त व माजी प्राचार्य श्रीधर गोपाळ घरत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत उपस्थित विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मने जिंकली. या कार्यक्रमात एकूण १४१ उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे, मापगाव रा. जि. प. मतदारसंघाचे माजी सदस्य काका ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, गुरुवर्य चांदोरकर सर, माजी प्राचार्य श्रीधर घरत, श्री सेवाशक्ती पतसंस्था चोरोंडे अध्यक्ष सीताराम कवळे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, मान तर्फे झिराड ग्रामपंचायत उपसरपंच राकेश पाटील, होमगार्ड विभागाचे निवृत्त अधिकारी सुरेश गुरव, मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच उनीता थळे, माजी ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, मापगाव विभाग बचतगट प्रमुख शलाका थळे, माजी सदस्य संजय शिंदे, चंद्रकांत खोत, किशोर सातमकर, अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सतिश घाडी, लक्ष्मण माने, परेश सुर्वे, विजय घरत, मुनावर कुर, राजेंद्र घरत, सतिश पाटील, निखिल करंजुकर, हेमंत नेमन, प्रितम सुर्वे, चेतन सुर्वे, संदीप थळे, प्रफुल्ल थळे, निलांबर थळे, युवा नेता सूचित थळे, लक्ष्मी नारायण विद्यामंदिर टाकादेवी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच त्यांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रास्ताविक चांदोरकर सर यांनी केले, तर संजय शिंदे यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन विवेक जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांदोरकर सर, प्रफुल्ल थळे, चंद्रकांत खोत, संजय शिंदे, युवा नेता सूचित थळे, किशोर सातमकर, लक्ष्मी नारायण विद्यामंदिर शाळेचे शिक्षक व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!