• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोबाईल टॉवरच्या ४८ बॅटऱ्या चोरांनी केल्या लंपास

ByEditor

Jun 25, 2024

मिलिंद माने
महाड :
महाड अद्योगिक क्षेत्रातील काळीज गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या वोडाफोन कंपनीच्या एका टॉवर च्या ठिकाणा हुन चोरांनी ४८ बॅटऱ्या लंपास केल्या आहेत. काळीज गावच्या हद्दीमध्ये मोबाईल टॉवरच्या चोरी केलेल्या बॅटऱ्यांची अंदाजे किंमत ३३६०० रुपये इतकी असून ही चोरी २१/६/२०२४ च्या रात्री ११ ते २२/६/२०२४ च्या सकाळी ८:१५ वाजण्याच्या दरम्यान झाली आहे.

याबाबत फिर्यादी जयेश दिलीप शिंदे रा. धामणे यांनी महाड अद्योगिक क्षेत्रातील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महाड तालुक्यातील काळीज गावच्या हद्दीमध्ये वोडाफोन कंपनीचा टॉवर आहे. वीज गेल्यानंतर टॉवर सुरू ठेवण्यासाठी एक्साइड कंपनीच्या ४८ बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या. त्या कोणीतरी अज्ञात चोरट्यानी २१/६/२०२४ च्या रात्री ११ वाजल्यापासून ते २२/६/२०२४ च्या सकाळी ८:१५ वाजण्याच्या दरम्यान चोरून नेल्या. या बॅटऱ्याची अंदाजे किंमत ३३६०० एवढी आहे. या चोरीचा गुन्हा महाड अद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. ना. ईकबाल शेख हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!