• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप; वाशी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

ByEditor

Jun 25, 2024

विनायक पाटील
पेण :
वाशी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व कमिटीतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

रायगड जिल्हा परिषद वाशी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश ठाकूर, उपसरपंच कोमल भाई म्हात्रे, सदस्य सुनिल पाटील, राजेंद्र थवई, सुरेखा पाटील, सुनंदा थवई यांनी स्वखर्चातून १ ली ते ५ वी च्या ४५ वि‌द्यार्थ्यांना प्रत्येकी दप्तर, वह्या, कंपासपेटी, पाणीबॉटल व छत्री इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आहे. यावेळी समाजसेवक भाई म्हात्रे, सदस्य अरुण रामचंद्र म्हात्रे, ऋतिकेत गजानन ठाकूर उपस्थित होते. याबरोबर ग्रुप ग्रामपंचायत वाशीचे ग्रामसेवक, कर्मचारी वर्ग आदींसह पालकवर्ग उपस्थित होते.

वाशी येथील रा. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून वाशी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एक चांगला उपक्रम राबवून विद्यार्थीबरोबर पालकांचे मनोबल वाढवले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी शाळेतील शिक्षिकांनी या सक्षम आणि कार्यशील ग्रामपंचायतीचे आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!