• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक, आज मतदान

ByEditor

Jun 26, 2024

मुंबई : आज महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. मुंबई, कोकणमध्ये पदवीधर मतदारसंघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे. या जागांसाठी आज मतदान होणार आहे तर १ जुलै रोजी मतमोजणी होईल. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

कल्याण-डोंबिवलीतील मतदारांची संख्या किती?

या निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवलीमधील चार विधानसभा मतदारसंघात एकूण २७ बुथ असून १८ हजार ७८३ मतदार आहेत, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात बिर्ला कॉलेज येथे १५ बूथ असून एकूण ९ हजार सातशे ४४ मतदार आहेत, कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये सिस्टर निवेदिता शाळेत पाच बूथ असून एकूण ३६११ मतदार आहे, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात नूतन विद्यामंदिर येथे चार बूथ असून २ हजार ९६५ मतदार आहेत, डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये साऊथ इंडियन शाळेत ३ बूथ असून एकूण २ हजार ४६३ मतदार आहेत.

महायुतीचाच उमेदवार निवडून येणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पत्नीसह डोंबिवलीतील मतदान केंद्रावर दाखल झाले, मंत्री चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला राहिलाय, या मतदारसंघात यंदा देखील महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास बोलून दाखवला.

कोकण पदवीधर मतदारसंघांत कोणामध्ये लढत?

  • निरंजन डावखरे : भाजप
  • रमेश कीर : काँग्रेस

कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण किती मतदार?

  • रायगड- २३ हजार ३५६ स्त्री, ३० हजार ८४३ पुरुष, ९ तृतीयपंथी
  • रत्नागिरी- ९ हजार २२८ स्त्री, १३ हजार ४५३ पुरुष
  • सिंधुदुर्ग- ७ हजार ४९८ स्त्री, ११ हजार ५३ पुरुष
  • एकूण- २ लाख २४ हजार २२५

मुंबई पदवीधर मतदारसंघात कोणात लढत?

  • शिवसेना ठाकरे गट – अनिल परब
  • भाजप – किरण शेलार

मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण मतदार किती?

  • मुंबई शहर– २ हजार १४ स्त्री, तर ५११ पुरुष मतदार
  • मुंबई उपनगर- ९ हजार ८७२ स्त्री, तर ३ हजार ४४२ पुरुष
  • एकूण- १५ हजार ८३९ मतदार

मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये कोणाकोणात लढत?

  • शिवसेना ठाकरे गट -ज. मो. अभ्यंकर
  • भाजप – शिवनाथ दराडे
  • शिक्षक भारती – सुभाष मोरे
  • शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार – शिवाजी शेंडगे
  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – शिवाजी नलावडे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!