• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी कार्तिक जैन, मयूर जैन यांची बिनविरोध निवड

ByEditor

Jun 26, 2024

प्रतिनिधी
नागोठणे :
2024-2026 या वर्षासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे ‘गव्हर्निंग कौन्सिल सदस्य’ म्हणून रायगड क्षेत्रातून एसएसओएसपी कॉलेजचे सीईओ कार्तिक किशोर जैन यांच्यासह मयूर चंपालाल जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) ही महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, आणि सेवा पुरविणाऱ्या सर्व संघटना व संस्थांची शिखर संस्था आहे.

महाराष्ट्र चेंबर हे शासन दरबारी उद्योजकांच्या विविध समस्या मांडणे, प्रश्न सोडविणे, उद्योजकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी विविध संकल्पना राबविणे, महाराष्ट्रात नवनवीन उद्योग निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे, तसेच राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील उद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी मदत करणे यासाठी कार्यरत आहे. आयात-निर्यात करणाऱ्या उद्योजकांसाठी योग्य दिशा दाखवणे आणि शासन दरबारात त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कामकाजात सक्रिय सहभाग घेणे या सर्व बाबतीत महाराष्ट्र चेंबर गेल्या ९७ वर्षांपासून सक्रिय आहे. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि शिखर संस्था आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र चेंबरचे विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.

चेंबर ऑफ कॉमर्सचे योगदान व्यापार आणि व्यवसायाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही संस्था उद्योग आणि व्यापाराच्या समस्यांचे निराकरण करते आणि उद्योजकांना शासन दरबारी सहाय्य प्रदान करते. कृषी व व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या माध्यमातून आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे कार्तिक जैन यांनी ‘रायगड जनोदय’शी बोलताना सांगितले. गव्हर्नींग कौंसिल मेंबर म्हणून रायगड जिल्ह्यातून नागोठणे येथील कार्तिक किशोर जैन व मयूर चंपालाल जैन यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!