अमोल चांदोरकर
श्रीवर्धन : तालुक्यातील दाडंगुरी येथे दि. 7 जुलै रोजी अस्थी विसर्जन शेडचा भूमिपूजन सोहळा पार पडला. भारतीय जनता पक्षाचे श्रीवर्धनमधील डॅशींग नेते प्रशांत शिंदे हे या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रशांत शिंदे यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षाकडून तीन लाख रुपयाची भरघोस मदत शेडसाठी उपलब्ध झाली. दांडगुरी ग्रामपंचायत शेजारील जागेमध्ये या शेडचे भूमिपूजन करण्यात आले असुन लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी दांडगुरी गाव मुंबई मंडळ अध्यक्ष भिकू अण्णा सावंत, दांडगुरी गावचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे कट्टर कार्यकर्ते जगन्नाथ पाटील, माजी उपसरपंच श्रीपाल कवाडे, पोलीस पाटील गायत्री शेलार यांच्यासह सचिव अनंत सावंत, वसंत धांदृत, ज्येष्ठ नागरिक शंकर करंबे, गजानन इंदुलकर, विलास शेलार, माजी महिला अध्यक्ष वनिता लाड, कल्पना शेलार, विद्यमान महिला उपाध्यक्ष तारमती सावंत व इतर ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.