• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लाचखोर महिला तलाठी पल्लवी भोईरकडे सापडली लाखोंची माया

ByEditor

Jul 8, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
तालुक्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बामणोली सजाच्या प्रभारी महिला तलाठी पल्लवी यशवंत भोईर (वय 39 वर्षे, तलाठी, सजा बामनोली (अति कार्यभार), (मूळ नेमणूक सजा खंडाळा तालुका अलिबाग जिल्हा रायगड) हिला ५ हजारांची लाचेची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच घेताना रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरझडतीमध्ये दोन फ्लॅटसहित जमीन, वाहने सापडली असून त्याची किंमत लाखोंच्या घरात आहेत.

लाचखोर महिला तलाठी पल्लवी यशवंत भोईर हिने सातबारा उताऱ्यात वारस म्हणून नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे हिने ५ हजारांची लाचेची मागणी करून ५ हजार रुपयांची रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आले होते. तद्नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिने जमवलेलया माया बाबत अधिक माहितीसाठी घरझडती घेतली असता अलिबाग तालुक्यातील चेवले नगर, अलिबाग येथे 2 बीएचके सदनिका, अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वरसोली येथे दीड गुंठे शेतजमीन, पाली, ता. सुधागड येथे 2 बीएचके सदनिका असून तिच्याकडे मारुती वॅगनर कार, होंडा शाईन मोटारसायकल तर होंडा अविएटर मोपेड बाईक सापडली आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये रु.2,24,228/- किंमतीच्या फर्निचर व इतर गृहउपयोगी वस्तू आढळून आल्या आहेत. रोख रक्कम रुपये 3,728/- इतके सापडले मात्र ते घर खर्चाचे असल्याने परत करण्यात आले आहेत. याशिवाय 42 ग्राम सोन्याचे दागिने सापडले मात्र ते स्त्रीधन असल्याने परत करण्यात आले आहे.

आरोपी लोकसेवक महिला तलाठी पल्लवी यशवंत भोईर हिस 5,000/- लाच घेताना लाच लुचपत विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नवनाथ चौधरी, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस शिपाई सचिन आटपाडकर, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने कारवाई केली होती.

रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. असे आवाहन लाच लुचपत विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!