देवेंद्र दरेकर
पोलादपूर : कशेडी घाटामध्ये अपघाताचे सातत्य कायम असून कशेडी घाटात ४ वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे.
कशेडी टॅप पासून दोन किलोमीटर अंतरावर बारामती पुणे ते दापोली जाणारी हुंदाई आय ट्वेंटी गाडीला मागून जाणाऱ्या टँकरने ठोकर दिल्याने सदर गाडी रस्त्याचे डाव्या बाजूस नाल्यामध्ये गेली तसेच बारामती पुणे ते दापोली जाणारी क्रेटा कार गाडीने टँकरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा अशोक लेलँड ट्रक गाडीला समोरासमोर ठोकर दिल्याने अपघात घडलेला आहे.

अपघातामधील दोन्ही कार गाड्यांच्या एअर बॅग ओपन झालेले आहेत. तसेच अपघातामध्ये हुंदाई i20 गाडीमधील मागे बसलेला प्रवासी दत्तात्रय शरद टेके यांना ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत झाल्याचे घोषित केले आहे.