• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोटरी क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षपदी संयोगिता टेमघरे यांची निवड

ByEditor

Jun 28, 2024

विनायक पाटील
पेण :
रोटरी क्लब ऑफ पेणचा पदग्रहण सोहळा पेण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पार पडला. या पदग्रहण समारंभाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे जिल्हा प्रांतपाल रोटरियन शितल शहा, असिस्टंट गव्हर्नर रोटरियन नितीन कल्यान, रोटरियन विक्रम जैन हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदी रोटरियन संयोगिता टेमघरे, सचिव पदी मधुबाला निकम, खजिनदारपदी जयेश शहा यांची सन 2024 साठी निवड झाली.

जगभरात 195 देशांपैकी 194 देशांमध्ये जवळपास 14 लाख रोटरीचे सदस्य असून प्रत्येक सदस्याला रोटरीन असे संबोधले जाते. दर आठवड्याला रोटरियन फेलोशिप ,सेवा, शांतता, मैत्री आणि व्यवसाय विकासाच्या संधीसाठी एकत्र येत असतात. रोटरी क्लब ऑफ पेणची स्थापना 10 जून 1994 साली झाली होती. आपल्या तीस वर्षातील सेवेच्या कारकिर्दीत रोटरी क्लब ऑफ पेणने समाजाकरिता विविध स्तुत्य उपक्रम राबविले आहेत व समाजकल्याणासाठी हातभार लावला आहे. रोटरीच्या सामाजिक कार्यासाठी सहकार्य करणारे राजू पिचीका, ॲड. मंगेश नेने, डॉ. सोनाली वणगे, डॉ. किशोर देशमुख, विनोद शहा, योगेश जैन यांचा सत्कार करण्यात. आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरियन संयोगिता टेमघरे यांनी नवीन वर्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर आगामी वर्षात आपण सामाजिक कार्यासाठी काय करणार याचा थोडक्यात अहवाल सादर केला. यात दिव्यांग मुलांच्या समस्या व निराकरण, वृद्धांसाठी विविध उपक्रम, पर्यावरण जनजागृती व संरक्षण, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसाठी आणि व्यसनमुक्ती करिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचा विचार दर्शविला. या पदग्रहण कार्यक्रमातच दोन नवीन रोटरी कम्युनिटी कॉरप्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच एका गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल, रोहा, कळंबोली, लोणावळा आदी ठिकाणावरून रोटरीचे सभासद उपस्थित होते. तसेच पेण मधील ॲड. मंगेश नेने, डॉक्टर मनीष वनगे, डॉ. सोनाली वनगे, ॲड. डॉ. नीता कदम, लिटिल एंजल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रीता कारखानीस आदी मान्यवर तसेच रोटरी क्लब ऑफ पेणचे सर्व रोटरियन कुटुंबासहित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराश्या टेमघरे हिने केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!