• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अतुल म्हात्रे यांची नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

ByEditor

Jun 29, 2024

विनायक पाटील
पेण :
तालुक्यातील कणे येथील गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घराला आग लागली व प्रचंड नुकसान झाले. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावता यावा यासाठी पेण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे तरूण, उच्चशिक्षीत नेतृत्व अतुल म्हात्रे (मास्टर ऑफ आर्किटेक्ट-लंडन) यांनी गणेश दिनकर म्हात्रे यांची व त्यांचे कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांच्या कुटूंबियांना २५ हजार रुपयांची मदत देऊन या कुटुंबाचे सांत्वन केले.

यावेळी अतुल म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे कार्यकर्ते भास्कर पाटील, नागाजी मारुती पाटील, बळीराम पांडुरंग पाटील, अनंत बाळाराम पाटील, रविकांत पाटील आदी निष्ठावान कार्यकर्ते व धिरजी विठोबा पाटील, महेंद्र ठाकुर, शेखर शेळके, राजेंद्र झेमसे, नरहरी पाटील, आर. के. सर, अजित पाटील आदी कार्यकर्ते व कणे व इतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या नुकसानग्रस्त कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून मदत केल्याबद्दल अतुल म्हात्रे यांचे कणे येथिल कार्यकर्ते व उपस्थित ग्रामस्थांनी आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!