• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

ByEditor

Jun 30, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार अलिबाग येथील हॉटेल साई इन येथे त्यांच्या पक्षीय कामाकरिता आले असता रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा पेण नगरपरिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील व पेण मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील व त्यांच्या टीमने शेलार यांची सदिच्छा भेट घेतली.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रायगड जिल्ह्याचे युवा नेते अनिरुद्ध पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शेलार यांनी अभिनंदन केले. रायगड जिल्हा हा मुंबई व पुण्याला लगत असलेला जिल्हा आहे, अनेक गुणवान व होतकरू खेळाडू रायगड जिल्ह्यात आहेत, त्यांना योग्य संधी मिळवून देणे व भविष्यात रायगड जिल्ह्यातील गुणवान खेळाडू महाराष्ट्राच्या व देशाच्या संघात खेळावेत ह्या दृष्टीने आपण जिल्हा क्रिकेट असोसिएशनला लागेल ती मदत करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. येणाऱ्या काळात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी आपल्या हक्काचे मैदान मिळावे अशी मागणी जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी आशीष शेलार यांच्याकडे केली असता शेलार यांनी नियोजित प्रस्ताव व शासनाची क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेचा अहवाल आपण द्यावा त्याप्रमाणे आपण योग्य तो निर्णय केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत घेऊ असे आश्वासन शेलार यांनी जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिले. ह्या प्रसंगी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जयंत नाईक, डॉ. राजाराम हुलवान, संदेश गुंजाळ, हुसेन तांबोळी, प्रवीण वानखेडे उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!