• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर पोलिस प्रशासनातर्फे कारवाई

ByEditor

Jul 3, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उग्ररुप धारण करीत असून अनधिकृत पार्किंगमुळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जात आहेत. विविध अपघात व अनधिकृत पार्किंगमुळे आजपर्यंत ८०० हुन जास्त व्यक्तींचा मृत्यू उरणमध्ये झाला आहे. या पार्श्वभूमीवर उरण परिसर व मुख्यत्वे शंकर मंदिर जासई, हायवे मार्गावर डीसीपी तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गलांडे व ट्रॅफिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अन‌धिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली.

यावेळी कंटेनर, मालवाहतूक गाड्या, टेम्पो, ट्रक आदि वाहनांवर, वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे उरण परिसर, जासई शंकर मंदिर, NH4B हायवे रोड आदि परिसर मोकळा झाला आहे. अन‌धिकृत पार्किंग केलेली वाहने हटविल्याने नागरिकांचा प्रवास सुलभ, आनंददायी झाला आहे.

जानेवारी ते आजपर्यंत एकूण ७३८९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. उरण परिसर, शंकर मंदिर जासई, NH4B या मार्गावर उभ्या असलेल्‌या अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. चालक व मालकांनी आपली वाहने अनधिकृतरित्या कुठेही पार्क करू नये. वाहतू‌कीच्या नियमांचे पालन करावे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन कोणीही करू नये. जो कोणी अनधिकृत पार्कीग करेल त्या वाहनचालक व मालकावर कारवाई करण्यात येईल.

-वैशाली गलांडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!