• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘लाडक्या बहिणीं’साठी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी आले धावून

ByEditor

Jul 3, 2024

बहिणींना मोफत मार्गदर्शन व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विशेष सहकार्य

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील महिलांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी बुधवार, दि. ३ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी मदतीला धावून येत बहिणींना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती मदत केली.

महाराष्ट्र शासनाने हि योजना जाहीर केल्यानंतर योजनेमार्फत दरमहा १५०० रुपये लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तलाठी व तहसीलदार कार्यालयात या बहिणींची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यावेळी अशिक्षित व वयोवृद्ध महिलांना कागदपत्रे भरून देण्यात मोठी अडचण येत असल्याने बहिणींच्या मदतीला मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी मदतीला धावून आले आहेत. त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून योजने संदर्भात परिसरातील महिलांना पात्र-अपात्र, अटी, शर्थी आदींविषयी महत्वाची माहिती व मोलाचे मार्गदर्शन मिळवून दिले. तसेच महिलांना फोटो, उत्पनाचे दाखल्यासाठी लागणारे फॉर्म व इतर सर्व प्रकारच्या फॉर्मची झेरॉक्स व सहकाऱ्यांच्या मार्फत विविध फॉर्म भरून देण्यासाठी गावातच आणि एकाच छताखाली सुविधा उपलब्ध करून देत या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आहे. याबद्दल लाडक्या बहिणींनी आपली होणारी हेळसांड, वेळ व पैशांची बचत केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे आभार मानले आहेत.

यावेळी सचिन घाडी यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ हि योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची होणारी धडपड व विविध प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी त्यांना येत असलेली अडचण लक्षात घेऊन केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून मी माझ्या वैयक्तिक खर्चाने आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने विविध प्रकारचे फॉर्म भरून देणे व त्यांच्या झेरॉक्स, फोटो आदी सुविधा ह्या गावातच व एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे. तरी या योजनेचा आपल्या परिसरातील लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!