• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नेरळ पोलिसांनी दोन गुन्हे केले उघड; नेरळ पोलिसांची पुन्हा धडाकेबाज कामगिरी

ByEditor

Jul 3, 2024

दोन गुन्ह्यातील ४ आरोपी अटकेत

गणेश पवार
कर्जत :
दोन वेगवेगळ्या गुन्हयाचा तपास करत त्यातील एकूण ४ आरोपीना मुद्देमालासह पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आलं आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली नेरळ पोलिसांनी पुन्हा धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २६ मे रोजी मौजे माले गावात राहणारे गोपाळ लक्ष्मण वेहेले यांनी त्यांच्या घराच्या मागे मोकळ्या जागेत चरण्यासाठी सोडलेले ३ बैल हे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. हि बाब लक्षात आल्यावर वेहेले यांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. तेव्हा तक्रार दाखल होताच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गुन्हयाचा उलगडा करण्यासाठी तपास पथक नियुक्त केल. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहायक फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे, पोलीस शिपाई निरंजन दवणे, राजेभाउ केकाण, विनोद वांगणेकर यांचा समावेश पथकात केला.

या पथकाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्ह्यात आरोपींनी ३ गुरे भरून नेण्याकरीता स्कॉर्पिओ वाहन वापरल्याची माहिती प्राप्त केली. प्रथम स्कोर्पिओ वाहनाचा शोध घेवून आरोपी यांचे नावे निष्पन्न करण्यात आली. या आरोपींमध्ये साहिल नावेद शेख, इम्तियाज मोहम्मद इलियास शेख, अकबर जाबाज शेख, सर्व राहणार रेतीबंदर रोड, कल्याण पश्चिम यांना वाजता अटक करण्यात आली. तसेच आरोपींनी गुन्हा करण्याकरीता वापरलेली एक निळसर रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक केएल ०१ ओके ४६०९ ही देखील हस्तगत करण्यात आलेली आहे.

तर दुसऱ्या प्रकारणात नेरळ निर्माण नगरी सोसायटीच्या मोकळया जागेतून चिराग रामचंद्र धुळे यांची दुचाकी चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळी कोणत्याही प्रकारे तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना देखील आपले कसब पणाला लावत गुप्त बातमीदार यांच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणला. या गुन्हयात आरोपी सचिन सुनिल सोनावणे, वय ३२ , रा. कुलाबा, मुंबई यास आज अटक करण्यात आली आहे. तर आरोपी याचे ताब्यातून नेरळ पोलीस ठाण्याकडील नमुद गुन्हयात चोरलेली मोटार सायकल तसेच पनवेल, कामोठे, नेरुळ पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेल्या अशा एकुण ५ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. आरोपी हा सध्या पोलीस कोठडीमध्ये असून नेरळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत डी. डी. टेळे यांचे मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, सहा. फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार प्रविण लोखंडे,पोलीस शिपाई निरंजन दवणे, राजेभाउ केकाण, विनोद वांगणेकर, प्रशांत बेले व तांत्रिकदृष्टया मदत करणारे अक्षय पाटील (सायबर क्राईम, रायगड अलिबाग) यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!