• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या वतीने ‘एक पौधा, एक संकल्प’ कार्यक्रम

ByEditor

Jul 4, 2024

प्रतिनिधी
पोयनाड :
येथील झुंझार युवक मंडळाच्यावतीने झुंझारच्या क्रीडांगण परिसरात गुरुवार, दि. ४ जुलै रोजी “एक पौधा, एक संकल्प” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या माणुसकी प्रतिष्ठान ह्या संस्थेकडून मंडळाला मोफत विविध देशी रोपं देण्यात आली. ह्या रोपांचे पोयनाडच्या मैदानालगत व परिसरातील मोकळ्या जागेत लागवड करून त्यांचे सुरक्षित संगोपन करण्याचा संकल्प यावेळी मंडळाच्या प्रत्येक सदस्य, खेळाडू यांनी केला. आतापर्यंत झुंझारच्यावतीने क्रीडांगण परिसरात १०० पेक्षा जास्त रोपांची लागवड करून त्यांचे व्यवस्थित संगोपन केले आहे. प्रत्येकांनी एक झाड लावून ते वाढवण्यासाठी प्रयत्न करून संपूर्ण परिसर सुंदर व हिरवागार करण्याचा मानस मंडळाचा असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी झुंझारचे अध्यक्ष अन्वर बुराण, पोयनाडचे मंडळ अधिकारी महेश निकम, चरीचे मंडळ अधिकारी सूर्यकांत विधाते, सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, अनंत राऊत, अजय टेमकर, ॲड. पंकज पंडित, राजेंद्र जाधव उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!