घनश्याम कडू
उरण : उरण परिसरातील गावांमध्ये घरफोड्या सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारच्या दोन घरफोड्या या चाणजे गावात घडल्या आहेत. बंद दोन घरातील दरवाजे तोडून घरातील माल लंपास करण्यात आला आहे.
चाणजे येथील संजय म्हात्रे आणि अजित पुरो हे मुंबई व ठाणे येथे वास्तव्य करतात. त्यामुळे त्यांची घरे ही बंद असतात. ही संधी साधत चोरट्यांनी दि. 1/7/2024 रात्री घरफोडी करून घरातील चांदीच्या वस्तू व कपाटातील रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अशाच प्रकारच्या घरफोड्या इतर गावातही झाल्याने उरणच्या जनतेने जागरूक होऊन परप्रांतीय व अनोळखी व्यक्तीपासून सावधान रहात त्यांना गावात अथवा आजूबाजूच्या परिसरात फिरताना दिसल्यास मनाई करणे अथवा पोलिसांना याची कल्पना देणे आवश्यक आहे.
