• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे (डिके) रायगड पोलीस दलातर्फे सन्मानित

ByEditor

Jul 5, 2024

रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते दिले सन्मानचिन्ह

विनायक पाटील
पेण :
समाजसेवक व वक्रतुंड मित्र मंडळ पेणचे अध्यक्ष, गरजवंतांसाठी चंदनापरी झिजणारे व्यक्तिमत्व दत्ता कांबळे उर्फ डिके यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रायगड पोलीस दलातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

समाजाशी आपले काहीतरी देणं आहे ही भावना मनात ठेवून नेहमीच कार्यरत असणारे दत्ता कांबळे यांनी कोरोना काळात कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष, नागरिकांसह पोलीस व पत्रकार यांना मास्क, गोळ्यांचे वाटप केले. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून हायवे महामार्ग रायगड पोलिसांना रिफ्लेक्टर जॅकेट वाटप केले. तसेच हजारो नागरिकांची अपघाती विमा पॉलिसी काढली. महाडमध्ये पूर परिस्थिती आली होती तेव्हाही तेथे दत्ता कांबळे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अंतोरे येथे हाय मॅक्सची उभारणी केली. अशी एक नव्हे तर अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली असून यापुढेही ते समाजासाठीच झटणार असल्याचे दिसून येत आहे.

आज पेण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात समाजसेवक दत्ता कांबळे यांचे नाव आवर्जून घेतले जात आहे. क्रिकेट स्पर्धांचे बरेचजण आयोजन करत असतात पण दत्ता कांबळे यांची पेण तालुक्यातील नगरपालिकेच्या मैदानावर भरविण्यात येणारी डी. के. चषक ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून समजली जाते. या स्पर्धेची पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. गरिबीची जाण असणारा माणूस म्हणजेच दत्ता कांबळे. मित्र कसा असावा तर तो दत्ता कांबळे यांच्यासारखा असावा. दत्ता कांबळे यांनी आपल्या जवळपास 20 ते 25 मित्रांना रोजगार उपलब्ध करून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावला आहे.

दत्ता कांबळे यांना याआधीही बरेच पुरस्कार मिळाले आहेत. रायगड पोलीस दलातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दत्ता कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे. खरोखरच ही पेणकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!