• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राजिप शाळा साई येथे शैक्षणिक साहित्य वाटप

ByEditor

Jul 9, 2023

हरेश मोरे
साई /माणगांव :
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साई मराठी येथे 8 जुलै रोजी 30 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन मुंबई या ठिकाणी शासकीय पदावर अधिकारी म्हणून काम करीत असलेले दानशूर व्यक्तिमत्व प्रकाश गायकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय स्कुल बॅग व डॉ. फरीद चिमावकर यांच्याद्वारे छत्री तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक अखिलाबानू दळवी मॅडम, संतोष चव्हाण सर माजी विद्यार्थी प्रकाश गायकर, डॉ. फरीद चिमावकर तसेच साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हुसैन रहाटविलकर, उपसरपंच विठोबा मोरे, पोलीस श्रीधर अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते काशीराम मोरे, प्रविण अधिकारी, उमर सोलकर, गोविंद अधिकारी, सखाराम लाड, विलास सावंत, दीपेश जंगम,माज कोंडविलकर व पालक उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!