अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे रविवार, दि. ७ जुलै २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी मित्रमंडळातर्फे व महिला मंडळ मूनवली आणि मूनवली ग्रामस्थांनी मूनवली क्रिकेट मैदानाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या देशी वृक्षरोपांचे त्यामध्ये मुख्यत्वे पेरू, सीताफळ, आवळा, शेवगा, करंज अशा वेगवेगळ्या प्रकारची ७० झाडांची लागवड करत त्या वृक्षांच्या संगोपनासाठी शपथ घेण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी सचिन घाडी यांनी गेल्या दहा वर्षांपासून या परिसरात यशस्वी वृक्षारोपण चळवळ राबवून वृक्षांचे संगोपन करत आहेत, त्यांनी आजपर्यंत लावलेल्या रोपांचे मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे, याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, सदस्या सानिका घाडी, बहिरोळे पोलिस पाटील प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, ज्येष्ठ समाजसेवक श्री. भागवत, ज्येष्ठ नागरिक गोविंद अनमाने, संजय अनमाने, बाळाराम थळे, सुधाकर ठकरूळ, किशोर मोंढे, मधुकर सूद, मनीष खाडे, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, प्रवीण घाडी, युवा नेता सूचित थळे, शैलेश तिर्लोटकर, संतोष बांद्रे, अक्षय जाधव, अक्षय नागावकर, रोशन अनमाने, निकेश अनमाने, गितेश ठकरुळ, शलाका थळे, वर्षा अनमाने, महिला मंडळ मूनवली व मूनवली ग्रामस्थ, परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.