• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्यावर टाकादेवी येथे वटवृक्ष उन्मळून पडला; वाहतूक ठप्प

ByEditor

Jul 8, 2024

सूचित थळे यांच्या अथक प्रयत्नाने काही वेळातच वाहतूक सुरळीत

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्यावर आज, ८ जुलै रोजी दुपारच्या वेळी टाकादेवी येथे पावसामुळे वटवृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी युवा नेता व सामाजिक कार्यकर्ते सूचित थळे यांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नाने सदर वटवृक्ष बाजूला करण्यात यश आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड दरम्यान टाकादेवी येथे दुपारच्या वेळी एक मोठा वटवृक्ष पावसामुळे उन्मळून पडला होता. यावेळी कोणतीही हानी झाली नाही, मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व मापगाव ग्रामपंचायत माजी सरपंच सुनिल दशरथ थळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेता सुचित थळे यांनी स्वतःच्या जेसीबीच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत अमित थळे, हेमंत थळे, सागर दळवी, प्रज्ञेश दळवी, प्रशांत घरत, जितेंद्र दळवी व इतर सहकारी उपस्थित होते.

याबद्दल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व वाहनचालकांनी तसेच या परिसरातील ग्रामस्थांनी सुनिल थळे, सूचित थळे व सहकाऱ्यांचे आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!