• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित प्रौढ गटाची निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा

ByEditor

Jul 9, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
जिल्हा कॅरम असोसिएशन व अभिजित कॅरम क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. नथुराम पाटील स्मृतीचषक (कॅरम दिन) जिल्हा अजिंक्यपद प्रौढ गटाच्या पुरुष व महिलांसाठी निवड चाचणी कॅरम स्पर्धेचं आयोजन शनिवार, दि. २७ व रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी अलिबाग येथील जेएसएम कॉलेज जिमखाना हॉल येथे करण्यात आले आहे. हि स्पर्धा रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा असून रायगड जिल्ह्यातील पुरुष व महिलांच्या प्रौढ गटासाठी आहे.

सदरची स्पर्धा एकेरी स्वरूपात खेळवली जाणार आहे.स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व खेळाडूंनी आपली प्रवेश नोंदणी फी रूपये २०० नोंदणी शुल्कासह व संस्थेची संलग्नता फी रुपये १०० आधी भरली नसल्यास ती भरून आपले नाव व प्रवेश फी सह शनिवार, दि. २० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत खालील ठिकाणी स्विकारली जाणार आहे. दिपक साळवी (पोयनाड) – मो.नं ७०२०६०२३३५, सचिन नाईक (पनवेल) – ९२२२१७१२६०/८८५०४६२४११, पांडुरंग पाटील (कर्जत) – ७२७६३४७०१३, प्रदिप वाईगडे (कामोठे) – ९७७३१८३०३०, अमित यादव (रसायनी) – ९९६९६०८२८०/९८२२७९१५२०, अभिजित तुळपुळे (अलिबाग) – ९३७२२११८२८ यांच्याकडे नोंदणी करावी. शनिवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून रविवार, दि.२८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धेची सांगता होणार आहे. प्रत्येक खेळाडूंनी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला टीशर्ट परिधान करून स्पर्धा खेळणे बंधनकारक असणार आहे. हि स्पर्धा अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या सुधारित नवीन नियमांप्रमाणे खेळवली जाणार आहे.

कोणत्याही खेळाडूंनी स्पर्धा कालावधीत कोणत्याही प्रकारचे धूम्रपान व नशापान करण्यास बंदी आहे. प्रमुख पंच, सहाय्यक पंच व तांत्रिक अधिकारी यांचा निर्णय अंतिम असणार आहे. स्पर्धेच्या विजयंत्याना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव दिपक साळवी यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!