• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण

ByEditor

Jul 10, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन व नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

नगरपरिषद, नगरपंचायतमधील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे ज्या मागण्यांपैकी मुख्य मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत राज्याचे मुख्य सचिव, वीत्त विभाग सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि नगरविकास विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी १ वर्षे आणि ३ महिने होऊनही झालेली नाही. याकडे प्रामुख्याने लक्ष वेधण्याकरिता कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयावर व नगरपालिका प्रशासनालय कार्यालय येथे नगरपरिषद आणि नगरपंचायत संवर्ग संघर्ष समितीचे निमंत्रक व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, संघर्ष समितीचे नेते व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, संघर्ष समितीचे नेते व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व त्यानंतरच झालेल्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.

येत्या २० जुलै २०२४ रोजी पनवेल महानगरपालिकेतील कामगारांसह कोकण विभागीय भव्य मेळावा पनवेल येथे घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. या प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. आंदोलनाप्रसंगी कोकणातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, राकेश पाटील, भूषण काबाडी, अजिंक्य हुलवणे, शैलश गायकवाड, अंनत पाटील, दत्तगुरू म्हात्रे, रविंद्र आयनोडकर, संतोष कुडेकर, नरेद्र नांदगावकर, मनोज पुळेकर, आलिम मुल्ला, चव्हाण, सचिन रसाळकर, राहूल गायकवाड, हरेश जाधव, मधुकर भोईर, रमेश कांबळे, सिताराम म्हसकर, संगीता सोलंकी, दत्तात्रय डोहले, माधव सिद्धेश्वरे, राजेश सोलंकी, जितेंद्र पाडावे इत्यादी कोकण विभागातील नगरपरिषद, नगरपंचायत कामगार, नेते व प्रतिनिधी, भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!