सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज
● दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला ● कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त ● माणगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ● रोह्यात राजकीय घडामोडींना वेग; नाराज नेत्यांच्या दरे गाव भेटीने चर्चांना उधाण ● संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रारीप्रकरणी सचिवाविरोधात गुन्हा दाखल; समाजसेविका वैदेही सावंत यांच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश ● रायगड: राजकारणात काहीही शक्य! भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही खालापूरच्या चौक ग्रामपंचायतीत उबाठाचा उपसरपंच

माणगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसत माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री भरत गोगावले व आ. महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यात नेत्यांनी राष्ट्रवादीवर व घराणेशाहीवर जोरदार टीका केली.
मुख्य संपादक
रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ६:१७ ● २०४ वाचन (Views)
माणगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
जाहिरात (Advertisement)

पालकमंत्री भरत गोगावले, आ. महेंद्र दळवींची राजू साबळे व तटकरे कुटुंबावर जोरदार टीका

माणगाव (सलीम शेख)

माणगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. गांधी मेमोरियल हॉलमध्ये शनिवारी (ता. १४) पार पडलेल्या शानदार पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबीयांसह माजी नगराध्यक्ष, अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, युवासेनाप्रमुख विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. या मेगा पक्षप्रवेशामुळे माणगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात (Advertisement)

या सोहळ्यात माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका भाग्यश्री यादव, त्यांचे सुपुत्र तन्मय व तनिष यादव, विद्यमान उपनगराध्यक्षा रिया उभारे यांचे पती तथा माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर भारे, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, दिलीप जाधव, माजी नगरसेवक जयंत बोडेरे, हेमंत शेट, नगरसेक राजेश मेहता यांच्या पत्नी तथा माजी उपनगराध्यक्षा निलम मेहता व सुपुत्र पंकज मेहता, बाजार समितीचे संजय पंदेरे, तसेच कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, ममता थोरे-शेठ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जेष्ठ नेते विजयराज खुले, दिलीप भोईर, अँड. महेंद्र माणकर, नीलिमा घोसाळकर, दिलीप सांगळे, नितीन दसवते, विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

नेत्यांचे जोरदार निशाणे आणि राजकीय संघर्ष

पक्ष प्रवेश सोहळ्यादरम्यान महायुतीमधील अंतर्गत वाद आणि स्थानिक राजकारण उघडपणे समोर आले.

पालकमंत्री भरत गोगावले: त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित एकाधिकारशाहीवर कडाडून टीका केली. राजू साबळे यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले असते तर आज राष्ट्रवादीवर ही वेळ आली नसती, असे सांगत स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून संघटना चालवता येत नाही, असे गोगावले यांनी स्पष्ट केले. तसेच माणगाव नगरपंचायतीसाठी १५ कोटी आणि पाणीपुरवठ्यासाठी २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत त्यांनी विकासात्मक मुद्द्यांवर भर दिला.

आमदार महेंद्र दळवी: त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कार्यपद्धतीवर घराणेशाहीचा गंभीर आरोप केला. रायगडमधील सत्तास्थाने एकाच कुटुंबाभोवती केंद्रित झाली असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कुठे उरली आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतःच्या ताकदीवर मैदानात उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

विकास गोगावले: जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी ॲड. राजीव साबळे यांच्यावर निशाणा साधत, ते स्वतःला माणगाव नगरपंचायतीचे हुकूमशहा समजायचे, असा घणाघात केला. आता शिवसेनेचे सर्व वाघ एकत्र आल्यामुळे विरोधकांना पळता भुई थोडी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माणगावमधील या सत्तासंघर्षात एका बाजूला पक्षप्रवेशाद्वारे शिवसेनेने आपले शक्तिप्रदर्शन केले असून, स्थानिक पातळीवर मित्रपक्षांमधील उघड झालेली नाराजी आगामी नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत रंगतदार होणार असल्याचे संकेत देत आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.

रोह्यात राजकीय घडामोडींना वेग; नाराज नेत्यांच्या दरे गाव भेटीने चर्चांना उधाण

रायगडमधील नाराज नेत्यांनी दरे गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. रोह्यातील प्रमोद म्हसकर, सुरेश मगर आणि प्रदीप देशमुख यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

रायगड: राजकारणात काहीही शक्य! भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही खालापूरच्या चौक ग्रामपंचायतीत उबाठाचा उपसरपंच

रायगडमधील खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायतीत अनपेक्षित राजकीय समीकरण पाहायला मिळाले असून, भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेना (उबाठा) पक्षाचे निखिल मालुसरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.