सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज
● दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला ● कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त ● माणगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ● रोह्यात राजकीय घडामोडींना वेग; नाराज नेत्यांच्या दरे गाव भेटीने चर्चांना उधाण ● संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रारीप्रकरणी सचिवाविरोधात गुन्हा दाखल; समाजसेविका वैदेही सावंत यांच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश ● रायगड: राजकारणात काहीही शक्य! भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही खालापूरच्या चौक ग्रामपंचायतीत उबाठाचा उपसरपंच

रोह्यात राजकीय घडामोडींना वेग; नाराज नेत्यांच्या दरे गाव भेटीने चर्चांना उधाण

रायगडमधील नाराज नेत्यांनी दरे गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. रोह्यातील प्रमोद म्हसकर, सुरेश मगर आणि प्रदीप देशमुख यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
मुख्य संपादक
रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ | दुपारी ५:४५ ● ६५६ वाचन (Views)
रोह्यात राजकीय घडामोडींना वेग; नाराज नेत्यांच्या दरे गाव भेटीने चर्चांना उधाण
जाहिरात (Advertisement)

प्रमोद म्हसकर, सुरेश मगर आणि प्रदीप देशमुख यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने राष्ट्रवादीपुढे संघटनात्मक आव्हान

धाटाव (शशिकांत मोरे)

रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींचे पडसाद आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा तालुक्यातही उमटू लागले आहेत. जिल्ह्यातील नाराज नेत्यांनी नुकतीच सातारा जिल्ह्यातील दरे गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत रोह्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर आणि सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख यांचा समावेश असल्याचे समजते. या तिन्ही नेत्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हाने उभी राहिल्याचे चित्र आहे.

तीन प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

जाहिरात (Advertisement)
प्रमोद म्हसकर : खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. 'प्रमोद अनंत म्हसकर प्रतिष्ठान'च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात मोठे सामाजिक काम उभे केले असून, त्यांच्यासोबत तरुणांचा मोठा वर्ग जोडला गेला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी तिथेही जनसंपर्क वाढवला होता.

सुरेश मगर : रोहा पंचायत समितीच्या भुवनेश्वर गणातून निवडून आलेले सदस्य आणि कुणबी समाजाचे नेते सुरेश मगर हे चांगले संघटक व वक्ते म्हणून परिचित आहेत. पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात असून, त्यांचा जनमानसातील प्रभाव लक्षात घेता त्यांच्या संभाव्य निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रदीप (आप्पा) देशमुख : रोहा तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आणि 'रोहा सिटिझन फोरम'चे निमंत्रक प्रदीप देशमुख यांचा मराठा समाज व उद्योजक वर्तुळात मोठा संपर्क आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या कामाने प्रभावित होऊन ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.

समीकरणे बदलण्याची चिन्हे

गेल्या काही काळापासून रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्चस्वापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात मतभेद पाहायला मिळत आहेत. यापूर्वी रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. आता मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने या तिन्ही नेत्यांची दरे गावी भेट घडवून आणल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते.

या नेत्यांसोबत किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी जातात, यावर तालुक्यातील आगामी राजकीय गणिते अवलंबून असतील. दुसरीकडे, या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरते की रोह्यात नवे सत्तासमीकरण आकाराला येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.

माणगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसत माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री भरत गोगावले व आ. महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यात नेत्यांनी राष्ट्रवादीवर व घराणेशाहीवर जोरदार टीका केली.

रायगड: राजकारणात काहीही शक्य! भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही खालापूरच्या चौक ग्रामपंचायतीत उबाठाचा उपसरपंच

रायगडमधील खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायतीत अनपेक्षित राजकीय समीकरण पाहायला मिळाले असून, भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेना (उबाठा) पक्षाचे निखिल मालुसरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.