मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

रायगडमध्ये महायुतीत जुंपली! “महेंद्र थोरवे घटकेत घोड्यावर तर घटकेत गाढवावर”; अनिकेत तटकरेंचा घणाघाती पलटवार

रायगड: रायगड जिल्ह्यात शासकीय प्रकल्पांवरून महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर दारूच्या कारखान्यावरून टीका केल्यानंतर, आमदार अनिकेत तटकरे यांनी थोरवेंना "घटकेत घोड्यावर अन् घटकेत गाढवावर" अशी उपमा देत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्य संपादक
मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ८:०३ ● ३९४ वाचन (Views)
रायगडमध्ये महायुतीत जुंपली! “महेंद्र थोरवे घटकेत घोड्यावर तर घटकेत गाढवावर”; अनिकेत तटकरेंचा घणाघाती पलटवार
जाहिरात (Advertisement)
रायगड (विशेष प्रतिनिधी)

रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर मतदारसंघातील प्रकल्पांवरून महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात राजकीय वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, "महेंद्र थोरवे हे घटकेत घोड्यावर तर घटकेत गाढवावर असणारे व्यक्तिमत्त्व आहे," अशा घणाघाती शब्दांत त्यांच्यावर पलटवार केला आहे.

कर्जत-खालापूरमध्ये केंद्र व राज्य सरकारचे 'टोरंट' आणि इतर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध केला जात असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर निशाणा साधला होता. "शासकीय प्रकल्प नको असतील तर राष्ट्रवादीने आधी महायुतीतून बाहेर पडावे. पर्यावरणपूरक टोरंट प्रकल्पाला विरोध करणाऱ्या तटकरेंची खालापूर तालुक्यात दारूची फॅक्टरी असून, त्यात त्यांच्या मुलाची व साडूची भागीदारी आहे. तटकरेंनी ही एनओसी जबरदस्तीने मिळवली असून हा कारखाना बंद पाडू," असा इशारा थोरवेंनी दिला होता.

आमदार थोरवे यांच्या या विधानाचा समाचार घेताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले, "सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्यावर बोलल्याशिवाय आमदार थोरवे यांचा दिवस जात नाही अन् त्यांना झोपही लागत नाही. खासदार सुनील तटकरे हे थोरवेंसारखे मिटिंग घेऊन सेटिंग करणारे नाहीत. आमची गोदरेज किंवा टाटा कंपनीसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही."

महायुतीतील या दोन प्रमुख नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी पक्षात निर्माण झालेली ही दरी उघड झाली आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

खोपटा पुलावर रिक्षाचालकांची मनमानी; वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

प्रशासकीय दुर्लक्ष आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या अभावामुळे उरणमधील खोपटा पुलावर रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या चालकांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास प्रवासी, रुग्ण व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, संतापलेल्या नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

दुष्काळात तेरावा महिना! पाण्यासाठी जनता हवालदिल, तर श्रीवर्धन पालिकेकडून 'तारांगण'वर निधीची उधळपट्टी

एकीकडे संपूर्ण श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त असताना आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकवे लागत असताना, नगरपरिषदेने समुद्राकाठी 'तारांगण' उभारण्यासाठी लाखो-करोडोंचा निधी वळवल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना धडक देत जाब विचारला आहे.

माणगावमध्ये बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २५ जणांवर गुन्हा दाखल, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत ढालघर परिसरातील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहनांसह सुमारे २० लाख ७० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टेम्पोच्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गोरेगाव-मोर्बा मार्गावर भीषण अपघात

माणगाव तालुक्यातील गोरेगाव-मोर्बा मार्गावर वडवली गावाच्या हद्दीत कचरा टाकून परतणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.