मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

खोपटा पुलावर रिक्षाचालकांची मनमानी; वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

प्रशासकीय दुर्लक्ष आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या अभावामुळे उरणमधील खोपटा पुलावर रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या चालकांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास प्रवासी, रुग्ण व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, संतापलेल्या नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मुख्य संपादक
मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ७:०६ ● ४३२ वाचन (Views)
खोपटा पुलावर रिक्षाचालकांची मनमानी; वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
जाहिरात (Advertisement)
उरण (अनंत नारंगीकर)

प्रशासन व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे उरण तालुक्यात रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. खोपटा पुलावर दररोज रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून बेशिस्त वाहतुकीचे दृश्य पाहायला मिळत आहे. याचा नाहक त्रास प्रवासी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील सुमारे २५ टक्के सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अधिकृत आरटीओ परवाना (परमिट) मिळवून प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, दुसरीकडे सुमारे २० टक्के लोकांनी नोकरी-व्यवसायाला जोडधंदा म्हणून नियमांची पायमल्ली करत आरटीओ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून परवाने लाटले असल्याचे निदर्शनास येत आहे.

वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही कडक व सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्यामुळे अशा मुजोर रिक्षाचालकांचे धाडस वाढले आहे. खोपटा पुलावर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करणे, प्रवाशांसाठी मध्येच गाड्या थांबवणे यांमुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

बेकायदेशीरपणे आणि नियम मोडून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओ विभाग आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

रायगडमध्ये महायुतीत जुंपली! “महेंद्र थोरवे घटकेत घोड्यावर तर घटकेत गाढवावर”; अनिकेत तटकरेंचा घणाघाती पलटवार

रायगड: रायगड जिल्ह्यात शासकीय प्रकल्पांवरून महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर दारूच्या कारखान्यावरून टीका केल्यानंतर, आमदार अनिकेत तटकरे यांनी थोरवेंना "घटकेत घोड्यावर अन् घटकेत गाढवावर" अशी उपमा देत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

दुष्काळात तेरावा महिना! पाण्यासाठी जनता हवालदिल, तर श्रीवर्धन पालिकेकडून 'तारांगण'वर निधीची उधळपट्टी

एकीकडे संपूर्ण श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त असताना आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकवे लागत असताना, नगरपरिषदेने समुद्राकाठी 'तारांगण' उभारण्यासाठी लाखो-करोडोंचा निधी वळवल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना धडक देत जाब विचारला आहे.

माणगावमध्ये बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २५ जणांवर गुन्हा दाखल, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत ढालघर परिसरातील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहनांसह सुमारे २० लाख ७० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टेम्पोच्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गोरेगाव-मोर्बा मार्गावर भीषण अपघात

माणगाव तालुक्यातील गोरेगाव-मोर्बा मार्गावर वडवली गावाच्या हद्दीत कचरा टाकून परतणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.