अलिबाग वृत्तसेवा : महावितरण कंपनीकडून सामान्य ग्राहकांच्या घरावर बसवण्यात येत असलेल्या तथाकथित ‘स्मार्ट मीटर’मुळे वीज बिलात दुपटीने वाढ होत असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आता आक्रमक झाला आहे.
अलिबाग येथील शेकाप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत गणेशोत्सवानंतर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उरणकरांना प्रदीर्घ काळापासून भेडसावणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीच्या समस्येतून अखेर सुटका मिळाली आहे. गेल्या १८ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्ष आणि सततच्या पाठपुराव्यानंतर उरण शहराबाहेरून जाणारा नवीन बायपास उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे.
कामावरून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याला बेदम मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. २२) सायंकाळी उघडकीस आला आहे.
माणगाव तालुक्यातील सार्वजनिक दूरसंचार यंत्रणेच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे. निजामपूर येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) मोबाईल टॉवर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तांब्याच्या तारा आणि इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या चोरी करताना दोन संशयित आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
रायगड जनोदय - बातमी शोधा
उदा. उरण, अलिबाग, महाड, जुगार, शिवसेना, राशिभविष्य, टोलमाफी, इस्रो