• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विशेष आर्थिक क्षेत्रातील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे शरद पवार यांचे आश्वासन

ByEditor

Jul 11, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उरण, पेण, पनवेल तालुक्यातील मे. मुंबई इंटीग्रेटेड एसईझेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ६३/१अ अनुसार विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन करण्याकरीता दिलेल्या मे. विकास आयुक्त, (उद्योग) मुंबई यांचे परवानगी आदेशाचे कलम १ प्रमाणे शेतकऱ्यांना जमीन मिळकती मूळ किंमतीस परत करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. याबाबत सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटना यांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रमुख शिष्टमंडळाने महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याबाबत आपण सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वस्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, कोकण विभाग युवक अध्यक्ष प्रमोद बागल, गणेश नलावडे (नाना), उरण तालुका विधानसभा अध्यक्ष ॲड. दत्तात्रेय नवाले, ज्ञानेश्वर घरत (उरण अध्यक्ष), हेमंत म्हात्रे (पेण अध्यक्ष ), आनंद ठाकूर (सचिव), प्रभाकर अनंत मोकल (उपाध्यक्ष), रामदास थवई (सेक्रेटरी), प्रदीप मोकल (खजिनदार), सुमित घरत, रोहित ठाकुर, शांताराम म्हात्रे, रघुनाथ घरत, गणेश पाटील उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!