• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ठाकरेंच्या शिलेदाराचा निकाला लागला; मिलिंद नार्वेकर यांचा विजय

ByEditor

Jul 12, 2024

मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदार पार पडलं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आहेत. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले नार्वेकर यांना 23 मते मिळाली आहेत. त्यांना विजयासाठी एका मताची गरज होती. अखेर दुसऱ्या पंसतीच्या मतांमध्ये त्यांचा विजय झाला आहे. आजपर्यंत ते पडद्यामागे राहून काम करत आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक चुरशीची झाली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!