• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र अनिकेत जाधव सीए परिक्षा उत्तीर्ण

ByEditor

Jul 12, 2024

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील खांब विभागातील विठ्ठलवाडी गावचे रहिवाशी अरुण महादेव जाधव यांचा सुपुत्र अनिकेत जाधव याने सीए परीक्षेत चांगले गुण संपादन करून उत्तीर्ण झाला असुन आजपर्यंतच्या इतिहासात अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात असणाऱ्या विठ्ठलवाडी या खेडेगावातील अनिकेत जाधव यांनी विठ्ठलवाडी गावातच नव्हे तर संपूर्ण खांब विभागात प्रथमच सीए परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिला युवक होण्याचा मान पटकावला आहे.

सीएची परीक्षा अतिशय कठीण असते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी असते. यामुळे खेडेगावातील युवक ही कठीण परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. परंतु, हि शक्यता फोल ठरवत विठ्ठलवाडी सारख्या खेडेगावातील अनिकेत जाधव यांनी जिद्द व कठोर परिश्रम घेऊन अहोरात्र अभ्यासात सातत्य राखत ही कठीण परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याचा बहूमान मिळवला असुन विठ्ठलवाडी गावात आनंदाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल नवजीवन प्रसारक मंडळ खांबचे अध्यक्ष तथा गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे, विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांबचे संस्थापक-अध्यक्ष रविंद्र लोखंडे, लायन्स क्लब कोलाड-रोहाचे पदाधिकारी सर्व सदस्य, खांब कुणबी ग्रुप विभागाचे पदाधिकारी व सर्व सदस्य, निलेश नरे, कल्पेश चोरगे, समीर निंबाळकर, रोशन कदम तसेच समस्त विठ्ठलवाडी ग्रामस्थ यांनी अनिकेत जाधव याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!