• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोर्ट कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालणार -केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर

ByEditor

Jul 12, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण
: केंद्रीय राज्यमंत्री जहाज व बंदरे शांतनू ठाकूर यांची कोलकत्ता येथे भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. भेट घेऊन देशभरातील बंदर कामगारांच्या समस्या शिष्ट मंडळाने केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांच्या समोर मांडल्या.

यावेळी शिष्ट मंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांना निवेदन देण्यात आले व विविध समस्यावर सविस्तर चर्चा झाली. कामगारांच्या समस्या समजून घेऊन संबंधित पोर्टचे चेअरमन यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील व पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्ट मंडळात पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत, पोर्ट प्रभारी अण्णा धुमाळ, कोलकत्ता पोर्टचे समीर मुजुमदार आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!