• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

16 जुलै रोजी उरण विधानसभा मतदारसंघात ‘शिवसंवाद मेळावा’

ByEditor

Jul 15, 2024

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ’शिवसंवाद दौरा’ यशस्वी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

घनःश्याम कडू
उरण :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवार, दि. 16 जुलै 2024 रोजी उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसंवाद मेळाव्यासाठी उरणमध्ये येत आहेत. हा मेळावा जेएनपीटी टाऊनशिपच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे. त्यांच्या या शिवसंवाद मेळाव्याच्या आयोजनासाठी शिवसेना उरण तालुक्यातील पदाधिकार्‍यांची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.

या बैठकीमध्ये रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर व तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा हा शिवसंवाद दौरा आयोजित केलेला आहे हीच विधानसभा निवडणुकीची सुरुवात आहे. तरी सर्वांनी कामाला लागून व मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा दौरा यशस्वी करावा असे अहवान केले.

सदर मेळाव्याला उरण मतदार संघातील उरण तालुका, पनवेल तालुका व खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या शिवसंवाद मेळाव्याची तयारी जेएनपीटीचे विश्‍वस्त व माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी टाऊनशिपच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये जोरदार सुरू करण्यात आली आहे. या बैठकीला माजी सभापती विश्‍वास म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उपतालुका संघटक रुपेश पाटील, अमित भगत, के. एम. घरत, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, विभागप्रमुख एस. के. पुरो, द्रोणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे, संपर्कप्रमुख कल्पेश पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, शहर संपर्क संघटिका वंदना पवार, शहर संघटिका विना तलरेजा, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, सुजाता पाटील, रंजना तांडेल, शाखा संघटिका हसीमा सरदार, युवासेना उपजिल्हा अधिकारी नितेश पाटील, शहर अधिकारी आशिष गोवारी, विभाग अधिकारी अमित म्हात्रे, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, राम झिने, शेखर पडते, पंकज सुतार, शाहरुख गडी, फतेह खान, सिद्धेश म्हात्रे, श्री. ठाकूर, श्री. कोळी, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!