हरेश मोरे
साई /माणगांव : माणगांव तालुक्यातील डोंगरोली बौद्धवाडी येथे प्रज्ञाशील बौद्ध विकास मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने 8 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झाडे लावा वने वाढावा ही संकल्पना लक्षात ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता यावर्षी सुद्धा डोंगरोली ग्रामस्थ व मुंबई येथील नोकरीनिमित्त असलेले ग्रामस्थ एकत्र येऊन वृक्षारोपण केले.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मा. अशोक गायकवाड, डोंगरोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गायकवाड, ढेपे गुरुजी, उपसरपंच अक्षय जाधव, सदस्या अलका गायकवाड, स्मिता जाधव डोंगरोली ग्रामस्थ अध्यक्ष संजय गायकवाड, मुंबई मंडळ अध्यक्ष मोहन जाधव, मुंबई सचिव संतोष मोरे, रोहिदास मोरे, संजय जाधव, शेखर जाधव, समीर जाधव, गंगाधर जाधव, उमाजी जाधव, संतोष जाधव, मनवेश जाधव, देविदास जाधव, राजेश जाधव, सुरेश जाधव, सुभाष मोरे, विशाल लोखंडे, अंगणवाडी सेविका सारिका जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी डोंगरोली ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.