किरण लाड
नागेठणे : येथील महावितरण शाखेचे प्रमुख म्हणुन सहाय्यक अभियंता नितिन जोशी यांनी आज पदभार स्विकारला. यावेळी नागोठणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगच्छ देऊन स्वागत केले.
अगोदरचे नागोठणे महावितरण कार्यालयाचे प्रमुख वैभव गायकवाड यांची सात वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर कोल्हापूर येथे बदली झाली. त्यांच्या रिक्त जागेवर नितिन हरिश्चंद्र जोशी यांनी सहाय्यक अभियंता म्हणुन पदभार स्विकारला आहे. जोशी यांनी याअगोदर रोहा सब डिविजन कोलाड येथे सहाय्यक अभियंता या पदावर सात वर्षे काम केले आहे. त्यांचे मुळगाव रायगड जिल्ह्यातील तळा हे असुन ते इलेक्ट्रिक इंजिनिअरचे पदवीधारक आहेत.
जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितले कि, मी आजच पदभार स्विकारला असून नागोठणे विभाग हा मोठा असुन येथील भौगलिक परिस्थितीचा प्रथम मला अभ्यास करावा लागणार आहे. तरी सुद्धा ग्राहकांच्या विजेच्या संदर्भातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यावेळी पदभार स्वीकारतांना लाईनमन शंकर भगत, वरिष्ठ तंत्रज्ञ नरेंद्र सपकाळे, सहाय्यक कर्मचारी सुधीर शिर्के, कल्पेश दपके, सचिन हरपाल, काजल मॅडम, वेद जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.