• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणमध्ये भाजपतर्फे संगीतमय भजन स्पर्धा

ByEditor

Jul 31, 2024

5 ते 7 ऑगस्ट रोजी भजनामृत भजन स्पर्धा

विनायक पाटील
पेण :
पेण विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टीतर्फे ‘भजनामृत भजन स्पर्धा २०२४’ वारकरी भजन आणि संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदरच्या स्पर्धा दिनांक ५, ६, ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत हॉटेल सौभाग्य इन मेगा हॉल गणपती वाडी पेण येथे संपन्न होणार आहेत.

सदर स्पर्धा पूर्णपणे मोफत असतील असे सांगण्यात आले आहे. “करूनी भजनाचा जागर…ओलांडू भक्तीचा सागर” भजनामृत भजन स्पर्धा २०२४ चे आयोजन पेण-सुधागड मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार रवीशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून माजी आमदार धैर्यशील पाटील, रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतिष धारप, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. भजनामृत भजन स्पर्धा २०२४ दिनांक ५, ६, ७ ऑगस्ट २०२४ वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वारकरी भजन आणि संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक रु. ५१,०००, द्वितीय क्रमांक रु. ४१,०००, तृतीय क्रमांक रु. ३१,०००, चतुर्थ क्रमांक रु. २१,००० व इतर बक्षिसे प्रत्येक विजेत्या मंडळास आकर्षक सन्मान चिन्हासह सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच भजन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजन मंडळांना उत्तेजनार्थ ५००० व उत्कृष्ट पखवाज वादक व गायक यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येतील अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी दिली आहे.

भजनामृत भजन स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नोंदणी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील – ९१५८९१६२७५, वैकुंठ पाटील – ८३९००९९९९९, पेण तालुका सरचिटणीस संजय डंगर – ९२२७१६१९५५ यांच्याशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे. भजनामृत भजन स्पर्धा २०२४ भजन स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता कोणतेही शुल्क नसून सदरची भजन स्पर्धा मोफत असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!