प्रतिनिधी
अलिबाग : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी दिली.
ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्तळावर जाऊन आपले अर्ज भरावेत.
