• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपालिकेचे खेळाचे मैदान बनले डंपिंग ग्राउंड

ByEditor

Aug 3, 2024

वैशाली कडू
उरण :
उरण नगरपालिकेच्या हद्दीतील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत तक्रार करूनही कचरा उचलण्यात न आल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उरण नगरपालिकेच्या विमला तलावामधील लहान मुलांचे खेळण्याचे मैदान डंपिंग ग्राउंड बनले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना कल्पना देवूनही गेली कित्येक दिवस कचरा उचलण्यात आलेला नाही. यामुळे मच्छरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू सारख्या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खेळण्याचे साहित्यही गेली अनेक महिन्यापासून नादुरुस्त होऊनही याकडे लक्ष देण्यास नगरपालिकेला वेळ दिसत नाही. याबाबत आरोग्य निरीक्षक यांना कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.

शहरातील अनेक भागातील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले अनेक ठिकाणी पहावयास मिळते, त्यात आणखीन सार्वजनिक खेळांची मैदानेही डंपिंग ग्राउंड बनत चालल्याने मच्छरचा प्रादुर्भाव होऊन साथींच्या आजाराचा फैलाव होण्याची भीती वाटत असल्याने जनतेत नगरपालिकेच्या कारभारा विरोधात नाराजीचा सूर निघत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!